अचलेर, दि.१४: जय गायकवाड 
कोरोना या रोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाच्या नियमानुसार उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने आज जिल्हाभरात मेडिकल व दवाखाने वगळता सर्व बाजारपेठ ,किराणा दुकान बंद करून शांततेत कायद्याचे काटेकोर पालन करण्यात यावे असे आदेश देण्यात आले होते.
याची प्रभावी अंमलबजावणी करीत लोहारा तालुक्यातील अचलेर येथे सर्व किराणा दुकानदार, छोटे मोठे व्यापारी वर्ग यांनी आपले सर्व व्यवहार बंद ठेवले होते. नेहमी गजबज दिसणारा परिसर अगदी निर्मनुष्य दिसून आला.
 
Top