तुळजापूर , दि.१४:
मुंबई येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय ज्युनियर सॉफ्ट टेनिस स्पर्धेत उस्मानाबाद जिल्ह्यातील खेळाडूनी दिमाखदार कामगिरी करून दणदणीत यश प्राप्त केले आहे.
दि. १२ मार्च रोजी मुंबई स्कूल स्पोर्ट्स असोसिएशन येथे वैयक्तिक एकेरी बाद पद्धतीने ही स्पर्धा पार पडली.
या स्पर्धेत उस्मानाबाद जिल्हा ज्युनियर संघाने पुन्हा एकदा चमकदार कामगिरी करत सुवर्ण आणि रजत पदकांची कमाई केली. तसेच यशस्वी स्पर्धक राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.
१८ वर्षाखालील मुलींच्या गटात प्रियांका हंगरगेकर हिने सुवर्ण पदक पटकावले. तर मुलांमध्ये करण खंडाळकर याने द्वितीय क्रमांक पटकावून रजत पदक प्राप्त केले.
प्रियांका हंगरगेकर, करण खंडाळकर यांच्यासह यशराज हुंडेकरी, प्रज्वल ढवळे यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाकडून निवड झाली.
वरील सर्व खेळाडूंना संजय नागरे व हेमंत कांबळे यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.