नळदुर्ग , दि.१५:  
कुराण मधील आयाती विषयी शंका व्यक्त करून कुराण व खलिफा बद्दल अपप्रचार करून मुस्लिम समाजाची बदनामी करणाऱ्या उत्तर प्रदेश शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिजवी यांच्याविरोधात  गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी शहरातील मुस्लिम बांधवांनी नळदुर्ग पोलीस ठाण्याचे‌ सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश राऊत यांच्याकडे  निवेदनाव्दावारे केली आहे. 

 निवेदनात असे म्हटले आहे की 11 मार्च रोजी उत्तर प्रदेशच्या लखनऊ येथील शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिजवी आणि सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून इस्लाम धर्मातील सर्वात पवित्र ग्रंथ असलेल्या कुराण मधील 26 आयात मध्ये बद्दल करून वगळण्यात यावे अशी मागणी केली व  त्यानंतर  माध्यमांशी बोलताना कुराण तसेच मुस्लिम समाजाचे सुरुवातीचे  तीन खलिफा यांच्या विरोधात अनेक खोटे व बिनबुडाचे आरोप लावले. त्यात प्रमुख्याने त्यांनी सांगितले की कुराण हे आतंकवादीची शिकवण देते व इस्लामचे सुरुवातीचे तीन खलिफा यांनी ताकतीचा प्रयोग करून इस्लामचा फैलाव केला. तसेच कुराण मुळे मुस्लिम युवक आतंकवादकडे वळत आहेत . अशी चुकीची व खोटी माहिती प्रसिद्धी माध्यमांसमोर दिली. त्यामुळे इस्लाम धर्माची वाईट प्रतिमा  सर्वत्र निर्माण झाली आहे.

 त्यामुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्याचबरोबर इतर समाजातील लोकात चुकीची व खोटी माहिती अपप्रचार केल्यामुळे मुस्लिम धर्म व इतर समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम वसीम रिजवी यांनी केल्याचे आरोप करण्यात आले  आहे. त्यामुळे वसीम रिजवी यांच्या विरोधात भादवी कलम 295 प्रमाणे  गुन्हा दाखल करुन कडक शासन करण्यात यावे. 

कारण इस्लाम हा शांतीचा संदेश देणारा धर्म असल्याचे नमुद करुन  समाजकंटकानी चुकीची व खोटी माहिती पसरवून समाजात दुफळी निर्माण करण्याचे काम करीत असल्याचे म्हटले आहे.


 या निवेदनावर हाफिज व खारी सय्यद मैनोद्दीन जाहगिरदार आलेम मोहम्मद रजा, नगरसेवक शहेबाज काजी, मुस्ताक कुरेशी,माजी उपनगराध्यक्ष शरीफ शेख, महेबुब शेख, लतिफ  शेख  आदीच्या  सह्या   आहेत.
 
Top