नळदुर्ग ,दि.१५:  
मनसेचे विविध मागण्यांसाठी नगपालिकेच्या आवारातील  आयोजित आंदोलन न.प. प्रशासनाच्या लेखी आश्वासनामुळे  स्थगित करण्यात आले आहे.


 नळदुर्ग शहरातील शौचालय लाभार्थीना प्रोत्साहनपर असलेला 3 हजार रुपयेचा हप्ता वितरित करा,शहरात दररोज पाणी पुरवठा होण्यासाठी ठोस उपाययोजना करा,चावडी चौक (श्रीगणेश विसर्जन मार्ग) ते बोरी घाट रस्ता तात्काळ करा, बसस्थानक ते शास्त्री चौक पर्यंतचा मुख्यमार्ग दुभाजक पध्दतीने करून सुशोभित करा,आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दि.१५ मार्च रोजी हलगी नाद आंदोलन करण्यात येणार होते,परंतु जिल्हाधिकारी  यांनी जिल्ह्यात कोविड-१९ पार्श्वभूमिवर कड़क निर्बन्ध लागू केल्यामुळे, व पोलिस प्रशासनाने आंदोलन स्थगित करावे , मुख्याधिका-यांनी मनसेच्या शिष्टमंडळाची बाजू समजून घेऊन लेखी आश्वासन दिल्यामुळे आजचे आंदोलन मनसेने स्थगित करत,वरील मागण्या संदर्भात २एप्रिल पर्यन्त ठोस भूमिका घेऊन पालिकेने प्रत्यक्ष कृति करावी अन्यथा दि . २ एप्रिल रोजी नगापालिकेला टाळे ठोको आदोंलनचा इशारा  दिला आहे,

यावेळी जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे, शहराध्यक्ष अलीम शेख, सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी,  उपाध्यक्ष रमेश घोड़के, मनविसे शहराध्यक्ष सूरज चव्हाण,वि. से शहर सचिव आवेज इनामदार  आदी उपस्थित होते.
 
Top