तुळजापुर , दि. १५:
रविवारी जनता कर्फ्युला तुळजापूर शहरातील व्यापारी आणि नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. दिवसभर तुळजापूर शहर कडेकोट बंद होते. तुळजाभवानी मंदिर परिसरामध्ये पूर्णतः शुकशुकाट दिसून आला.
राज्य परिवहन महामंडळाची सेवा आणि वैद्यकीय सेवा वगळता तुळजापूर शहर पूर्णपणे रविवारी बंद होते. अनेक दिवसानंतर झालेल्या जनता कर्फ्युस नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिल्याची प्रतिक्रिया मिळाल्या आहेत.
सकाळी दहा वाजेपर्यंत अत्यंत तुरळक नागरिक रस्त्यावरून फिरताना दिसून आले. मात्र त्यानंतर सायंकाळी सहा वाजेपर्यंत संपूर्ण शहरात शुकशुकाट दिसून आला. बाजार पेठ बंद होत्या .कोणत्याही प्रशासकीय अथवा नगरपरिषदेच्या माध्यमातून बंद करण्यासाठी फारसे प्रयत्न करावे लागले नाहीत.
बसस्थानक परिसर आणि मंदिर परिसर त्याचबरोबर भवानी रोड आणि मेन रोड या गर्दीच्या ठिकाणी पूर्णतः दुकाने आणि उपाहारगृहे बंद होती. बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांची संख्या अत्यंत नगण्य होती.