तुळजापूर, दि.१८ :
पिसाळलेल्या शिया वक्फ बोर्डचे (उत्तर प्रदेश) माजी अध्यक्ष वसीम रजवी याच्याविरूध्द रा.सु.का कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करुन अटक करण्याची मागणी तुळजापूर येथील मुस्लीम बांधवांच्या वतीने करण्यात आली.
मुस्लीम समाज बांधवानी तहसिलदार तुळजापूर यांचे मार्फत राष्ट्रपती महोदयांना दि. १८ रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, इस्लाम धर्माचा पवित्र धर्मग्रंथ कुराण मधील काही भाग हटविण्याची मागणी करणाऱी याचिका वसीम रजवी यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली असुन रजवी यांचे सदरचे कृत्य हे धार्मिक भावना दुखवणारे असून, त्याच्याविरुध्द राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
वसीम रजवी याने धर्मग्रंथातील कांही वचनांचा विपर्यास्त अर्थ घेऊन ते धर्मातुन हटविण्याची मागणी करताना इस्लाम धर्म ताकद व जबरदस्तीच्या बळावर वाढत आहे इ. असा धार्मिक भावना दुखावणारा संतापजनक आरोप करताना ती वचने धर्मग्रंथातुन हटविण्याची याचिकेव्दारे मागणी केली आहे. रजवी याचे म्हणणे निराधार तसेच देशातील शांततेला बाधा पोंहचवणारा आहे. सामाजिक स्वास्थ बिघडऊ पाहणाऱ्या रजवीवर रा.सु.का. नुसार कठोर कारवाई करावी, त्याला अशा कृतीबद्दल व समाजाची भावना दुखावल्याबद्दल रजवी विरूध्द कठोर शिक्षा करण्याची मागणी तुळजापूर येथील मुस्लीम बांधवाच्या वतीने करण्यात आली.
या निवेदनावर अॅड.मतीन बाडेवाले, खलील अहेमद शेख, रईस सिध्दीकी, हाज्जुमियाँ आतार, मतीन बागवान, मकसुद शेख, तौफीक शेख, मौलाना बिलाल रजा, रशीद तांबोळी, रिजाज सिध्दीकी, फहद तांबोळी, वाजीद नदाफ, समीर शेख, इम्रान शेख, खिजर सिध्दीकी, माजीद सिध्दीकी, पठाण एम.एम., के.टी, शेख, मुस्तफा नदाफ, आशपाक शेख, फैजान सिध्दीकी, अजगर शेख, आशपाक शेख, कलीम शेख, बाबुलाल पटेल, शरीफ बागवान, अमीर शेख, सलीम सय्यद, इस्माईल शेख आदी जणांच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी, उस्मानाबाद, पोलीस निरीक्षक, तुळजापूर यांना देण्यात आल्या.