चिवरी, दि.१८: राजगुरु साखरे मागील दोन दिवसांपासून हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील १८ ते २१ मार्च या दरम्यान अवकाळी पावसाची शक्यता दर्शवल्याने शेतकऱ्यांनी पीक काढणीस वेग दिला आहे.
त्या अनुषंगाने उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकरी सध्या पीक काढणीस, काढणी केलेले पिक मळणी करण्यासाठी लगबग करत असल्याचे चित्र दिसत आहे, तर काही शेतकरी काढणी पिक ताडपत्रीच्या सहाय्याने झाकून ठेवण्यासाठी लगबग करत आहेत,
अगोदरच शेतकरी कोरोना महामारी, अतिवृष्टी, अवेळी येणारा पाऊस यामुळे मेटाकुटीला आला आहे . त्यातच पुन्हा अवकाळी पावसाचे यामुळे बळीराजा धास्तावल्याचे चित्र दिसून येत आहे.