तामलवाडी,दि.२८:  तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील महसूल सज्जाच्या तलाठ्यांच्या मनमानी कारभाराचा फटका शेतकऱ्यांना बसत असून वेळेत कर्तव्य बजावत नसल्यामुळे त्यांच्या कामकाजावर प्रश्‍नचिन्ह निर्मान झाले आहे . 

ऑक्टोबर महिन्यामध्ये झालेल्या परतीच्या पावसाने संपूर्ण जिल्ह्यात थैमान घातले होते. यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. शासनाने याची दखल घेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदतीची घोषणा करून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर तत्काळ अनुदान वर्ग करण्याचे आदेश दिले होते. पिकाचे नुकसान होऊनही पाच महिन्यांचा कालावधी उलटला असताना अद्यापहि परिसरातील शेतकऱ्यांच्या खात्यावर कवडीहि जमा झालेली नाही.

 संबंधित तलाठी राजमाने यांच्याकडे तामलवाडी व सांगवी (काटी) या दोन महसूली सज्जाचा कारभार असून या सज्जा अंतर्गत चार गावातील शेतकऱ्यांचा समावेश आहे. 

या चार गावातील शेकडो शेतकरी अद्यापहि नुकसान भरपाई अनुदानापासून वंचित आहेत. दोन-तीन वेळा तलाठ्याकडे बँक खात्याची व आधार कार्डची झेरॉक्स प्रत देऊनहि अनुदान जमा होत नसल्यामुळे शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.संबंधित तलाठ्याच्या कामकाजाची चौकशी करुन त्यांच्यावर तत्काळ कारवाई अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
 
Top