काटी, दि.८ :
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील शिक्षणप्रेमी नागरिक, माजी ग्रामपंचायत सदस्य हारुण हुसेन शेख वय 60 वर्षे यांचे सोमवार दि.8 रोजी अल्पशा आजाराने सोलापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारा दरम्यान निधन झाले.
त्यांच्या पार्थिवावर सोमवारी सायंकाळी येथील मुस्लिम स्मशानभूमीत दफनविधी करण्यात आला.
त्यांच्या पश्चात, वडील, पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना नातवंडे असा परिवार आहे.