नळदुर्ग, दि.९:
तुळजापूर तालुक्यातील रामतीर्थ, रामनगर, गायरान तांडा, येडोळा, जखणी तांडा येथे एसबीआय फाउंडेशन मुंबई व दिलासा जनविकास प्रतिष्ठान, औरंगाबाद यांच्या समन्वयाने ग्रामसेवा कार्यक्रमांतर्गत दि. ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून प्रत्येक गावात सामाजिक कार्य करणा-या महिलांचा गौरव करण्यात आले.
यावेळी रामतिर्थचे सरपंच बालाजी राठोड, येडोळ्याचे सरपंच पद्माकर पाटील, उपसरपंच लक्ष्मी जाधव. रामतिर्थ येथील निर्मला राठोड, सिताबाई चव्हाण, वंदना राठोड, कांताबाई राठोड, गाढवे मॅडम तसेच येडोळा, गायराण तांडा, जकणी तांडा येथील घमाबाई पवार, सुवर्णा लोंढे, शोभा जाधव, सुनीता पवार, मिनाक्षी राठोड अदि महिला उपस्थित होते.
तसेच दिलासाचे प्रकल्प व्यवस्थापक विलास राठोड, गुरूदेव राठोड, भुषण पवार, रामू चव्हाण, ताराचंद पवार, सिताराम चव्हाण उपस्थित होते.