तुळजापुर,दि.९ :डाॕ. सतीश महामुनी
उस्मानाबाद रोड वरील तुळजापूर बायपास मार्गे लातूरला जाणाऱ्या महामार्गाचे काम अपूर्ण झाल्यामुळे गेल्या महिनाभरात सहा अपघात झाले आहेत. याबाबत स्थानिक नागरिकांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
उस्मानाबाद रोड वरील लातूर कडे जाणाऱ्या तुळजापूर बायपास मार्गावर धाकटे तुळजापूर तसेच मोरडा आणि या रस्त्यावरील उड्डाणपुलाच्या दरम्यान रस्त्याला जोडणारे मार्ग अपूर्ण असल्यामुळे तसेच चार पदरी मार्गाचे काम अपूर्ण असल्यामुळे गेल्या महिनाभरापासून या परिसरात सहा अपघात झाले आहेत . याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि उस्मानाबादचे जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून सदर रस्त्याचे काम पूर्ण करावे अशी मागणी करण्यात येत आहे.
चार पदरी रस्त्याचे काम पूर्ण असल्यामुळे वाहन चालकांना अपूर्ण कामाचा अंदाज येत नाही परिणामी या ठिकाणावर मोठ्या प्रमाणावर अपघात होत आहेत, चार चाकी वाहनांचे होणाऱ्या अपघाताचे प्रमाण लक्षात घेता या रस्त्याची दुरूस्ती आणि अपूर्ण काम तातडीने करण्याची गरज आहे.