जळकोट,दि.२९ : मेघराज किलजे तुळजापूर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची ४६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाइन पद्धतीने पार पडली. या सभेत शिक्षक सभासदांना दोन लेखवरून
दहा लाखापर्यंत कर्ज मर्यादा वाढवणे व झिरो तक्तवरून नऊ टक्के लाभांश देण्याच्या ठरावाला  सभासदाने एकमताने मंजुरी दिली.         

  तुळजापूर   तालुका शिक्षक पतसंस्थेच्या ऑनलाइन पार पडलेल्या या सभेला सकाळी  १०.३० वाजता पतसंस्थेचे चेअरमन  प्रशांत मिटकर यांच्या अध्यक्षतेखाली सुरवात झाली. प्रमुख अतिथी म्हणुन जिल्हा पतसंस्थेचे चेअरमन  एल. बी.  पडवळ , राज्य उपाध्यक्ष  अशोक जाधव , जिल्हा पतसंस्थेचे सचिव  नाना जगदाळे , व्हा. चेअरमन  मनोज चौधरी ,  जिल्हा नेते  राजाभाऊ गव्हाणे ,तालुका सरचिटणीस सुरेश राऊत , तुळजापूर तालुका पतसंस्थेचे सचिव  धनाजी मुळे , व्हा. चेअरमन  बी. सी. चव्हाण आदीसह सर्व संचालक मंडळ , तक्रार निवारण समिती अध्यक्ष  बापूराव मोरे , मोजके सभासद आणि कर्मचारी  प्रत्यक्ष उपस्थित होते.

          
 या ऑनलाइन सभेच्या सुरवातीलाच उत्साहाने सभासद मोठ्या प्रमाणात झूम ॲपद्वारे सहभागी झाले.यामध्ये तालुक्याच्या पंचायत समितीच्या नूतन सभापती  सौ .रेणुका इंगोले या ऑनलाइन तर नूतन उपसभापती  शरद जमदाडे हे प्रत्यक्ष उपस्थित झाले. 
          
 सभेची सुरवात महाराष्ट्रचे आराध्य दैवत आई तुळजाभवानीच्या फोटो पूजनाने झाली . यानंतर प्रातिनिधिक स्वरूपात कांही पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.सभेत १० लाख कर्ज,  शुन्य टक्के  वरून ९ टक्के  लाभांश, शिक्षक भवन, सभासदांच्या पाल्यांसाठी अभ्यासिका उभारणे असे ठराव मंजूर झाले. 
             

या वार्षिक सर्वसाधारण सभेला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष  बाळकृष्ण तांबारे यांनी सुरवातीपासून  उपस्थित राहून सभासदांशी हितगुज केले. आपल्या सदिच्छा व्यक्त करताना  तांबारे यांनी तालुक्यातील सर्व सभासदांनी संघटनेवर विश्वास ठेवून कारभार हाती सोपावल्याबद्दल आभार मानले.

 प्रास्ताविक संस्थेचे सचिव  धनाजी मुळे यांनी केले.मागील सभेचा इतिवृत्तांत वाचून कायम करण्यात आला तर सभासद हिताचे नवीन काही ठराव व पोटनियम दुरुस्तीचे वाचन करून त्यासाठी अनुसमर्थन मागितले. त्यास सर्वांनी हात वर करून समर्थन दिले.
             
अल्पसंख्याक संघटनेचे राज्याध्यक्ष  बशीर तांबोळी यांनीही  शुभेच्छा दिल्या व मार्गदर्शन केले.सभेचे सुत्रसंचलन बालाजी माळी यांनी  तर आभार  धनाजी मुळे यांनी मानले.
 
Top