जळकोट,दि.२९: मेघराज किलजे  जळकोट ता.तुळजापूर  येथील रहिवाशी बोरगाव केंद्राचे केंद्रप्रमुख शिवाजीराव सुरवसे यांची माडज( ता. उमरगा) येथे शिक्षण विस्तार अधिकारी उमरगा पंचायत समिती अंतर्गत पदोन्नतीने नियुक्ती  झाली आहे. सहशिक्षक म्हणून शिक्षण क्षेत्रात पदार्पण करून आपल्या कार्यकाळात भरीव कामगिरी करणारे सुरवसे हे अलौकिक व्यक्तिमत्त्व आहे.


शिवाजी सुरवसे यांनी  अत्यंत कठीण प्रसंगात शिक्षण घेतले. शिक्षण घेऊन त्यांनी सुरुवातीला डी एड केले. सुरुवातीला सहशिक्षक म्हणून लातूर येथे खासगी संस्थेत आपल्या शिक्षण अध्ययनाला सुरुवात केली. थोडे वर्षे संस्थेत काम केल्यानंतर उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात रुजु झाले. त्यानंतर त्यांनी ज्या- ज्या ठिकाणी नोकरी केली. त्या-त्या ठिकाणी विद्यार्थी घडविण्याचे कार्य करत राहिले. सहशिक्षक, प्राथमिक शिक्षक, प्राथमिक पदवीधर, मुख्याध्यापक व सध्या केंद्र प्रमुख म्हणून बोरगाव येथे कार्यरत होते. 


 सुरवसे यांना शिक्षण क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल तुळजापूर तालुका पंचायत समिती तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार व उस्मानाबाद जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.
शिवाजीराव सुरवसे यांची शिक्षण विस्ताराधिकारीपदी नियुक्ती झाल्याबद्दल जळकोट येथे मित्रपरिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला. 

या कार्यक्रमात माजी उपसरपंच बंकटराव बेडगे यांच्या हस्ते सुरवसे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अनिल छत्रे, ग्रामपंचायत सदस्य संजय माने, ग्रामपंचायत सदस्य संजय अंगुले,इरण्णा स्वने, ग्रामपंचायत सदस्य सय्यद तांबोळी, मेघराज किलजे, सतीश माळी, दत्ता पांचाळ, मंगेश सुरवसे आदीसह मित्रपरिवार उपस्थित होता.
 
Top