तुळजापूर,दि.२९ : 
मंगरुळ ता.तुळजापूर येथिल  ग्रामपंचायती च्यावतीने गावामध्ये  सोमवार रोजी स्वच्छता अभियान राबविण्यात आले.


तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथे दि.२९ मार्च रोजी   स्वच्छता अभियानास गावातील बाजार चौकातुन सुरुवात करुन मारुती मंदीर चौक,बस स्थानक,महिला प्रवाशी निवारा आदी ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी  सामाजिक अंतराचे पालन व शासकीय  नियमाचे पालन करुन स्वच्छता आभियान राबविण्यात आले.

 यावेळी  पॕनेल प्रमुख तथा  जि. प. सदस्य महेंद्र  धुरगुडे, मुकूंद डोंगरे, सुरेश डोंगरे, सरपंच सौ. विजयालक्ष्मी महेश डोंगरे, उपसरपंच गिरीष  डोंगरे, ग्रामपंचायत महाविकास आघाडीचे सर्व नुतन सदस्य,  मनोज धुरगुडे ,   आदमशहा फकीर, आप्पाराव जेटीथोर, विजय गरगडे, विरेश डोंगरे, राजकुमार डोंगरे, विश्वजीत डोंगरे, इंद्रजित हजारे, बिभीषण हजारे ,सुभाष पाचपुंडे, महादेव जाधव , पांडुरंग जाधव, वामन लबडे, शाहुराज कोरेकर, बालाजी सरडे सावकार, दगडु खंभीर तांबोळी आदी उपस्थित होते.
 
Top