तुळजापूर,दि.२२
भरधाव कार व दुचाकी यांच्यात शनिवारी दुपारी झालेल्या आपघातात दोघेजण जखमी झाल्याची घटना घडली आहे.
घटना स्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, सोलापूरहुन बायपास मार्गे उस्मानाबादकडे भरधाव वेगाने जाणारी स्विफ्ट कार व तुळजापूरहुन उदगीरकडे जाणा-या दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक बसुन झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना तुळजापूर नागपूर रत्नागिरी या महामार्गाच्या बाह्यवळण रस्त्यावर तुळजापूर शहरानजीक पाचुंदा चौकात घडली आहे.
उस्मानाबादकडे निघालेली स्विफ्ट (कार क्र. एम. एच. 13 बी. एन 65 22 ) तुळजापूर वरुन उदगीरकडे निघालेल्या भरधाव दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर तुळजापूर येथे उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठीजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.