तुळजापूर,दि. २२ :

तुळजापुर येथील दुय्यम निबंधक कार्यालय  श्रेणी ०१  मध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार सुरू असून या ठिकाणी दुय्यम निबंधक कार्यालयातील परवानाधारक मुद्रांक विक्रेते व दलाल हे नोंदणी शुल्क, हाताळणी शुल्क, डाटा एन्ट्री शुल्क त्याचबरोबर मुद्रांक शुल्क यांच्या दुप्पट तिप्पट रक्कम स्थावर मालमत्ता खरेदी विक्री करणारे गोर गरीब शेतकरी व नागरिकांकडून वसूल करत असून शासनाची व जनतेची फसवणूक करीत आहेत.

 त्याचबरोबर तुळजापूर येथील दुय्यम निबंधक कार्यालय येथे दररोज याच मुद्रांक शुल्क विक्रेते व दलालांचा गोंधळ पाहावयास मिळतो त्याचबरोबर दुय्यम निबंधक कार्यालयातील कर्मचारी देखील यात संगनमत असून त्यांचे काम तातडीने करतात असे पहावयास मिळाले ही प्रशासनाची बदनामी असून तुळजापूर येथील खरेदी-विक्री व्यवहार मोठ्या प्रमाणात होत आहेत, त्याचा फायदा हे तहसील समोरील मुद्रांक विक्रेते करत आहेत तरी प्रशासनाने या संबंधित भ्रष्ट कर्मचारी दलाल मुद्रांक विक्रेते यांच्यावर कठोर कारवाई करून मुद्रांक विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्यात यावी असे निवेदनात नमूद केले आहे. निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे निवेदनावर भ्रष्टाचार निर्मूलन समिति तालुका अध्यक्ष विजय भोसले, मंथन रांजणकर,बजरंग साळुंखे, विठ्ठल नागणे, यांच्या स्वाक्षर्‍या आहेत..


एकीकडे शासन रिअल इस्टेट क्षेत्राला चालना मिळण्यासाठी बाजारात लिक्विडिटी येण्याकरिता स्टॅम्प ड्युटी कमी करत असले तरी हे तुळजापूर तहसीलदार कार्यालयासमोरील मुद्रांक शुल्क विक्रेते जनतेकडून यांच्याकडून दुप्पट तिपटीने पैसे वसूल करत आहेत,ही बाब गंभीर आहे.
 
Top