नळदुर्ग,दि.२२:  आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या सुचनेनुसार नळदुर्ग याठिकाणी लसीकरणाची सुविधा उपलब्ध झाली.
संसर्गजन्य कोरोना विषाणुवर लसीकरण मोहिमेत शंका न बाळगता  लसीकरण करुन घेण्याचे आवाहन उस्मानाबाद जि.प. अध्यक्षा आस्मिता कांबळे यानी नळदुर्ग येथे लसीकरणाच्या शुभारंभप्रसंगी केले. दरम्यान सोमवार रोजी १०७ लाभार्थ्यानी लसीकरणाचा लाभ घेतला.


नळदुर्ग येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रात नागरिकासाठी कोविड शिल्ड लसीकरण मोहिमेचा सोमवार रोजी शुभारंभ करण्यात आला. यावेळी आस्मिता कांबळे उपस्थिताना मार्गदर्शन करताना बोलत होत्या.

कार्यक्रमाच्या प्रारंभी    जि.प. अध्यक्ष अस्मिता कांबळे , रुग्ण कल्याण समितीचे अध्यक्ष तथा जि.प. सदस्य  प्रकाश चव्हाण , नगरसेवक नय्यर जाहागिरदार, उदय जगदाळे, पञकार विलास येडगे,  शिवाजी नाईक,पांडुरंग पोळे  आदी मान्यवरांचा सत्कार प्रा. आ.केंद्राच्यावतीने  करण्यात आले. 


या कार्यक्रमास पञकार  पांडुरंग पोळे, शिवाजी नाईक , प्रतिष्ठित नागरिक बाबुराव वैद्य ,निवृत्त पोलिस कर्मचारी आशोक वैद्य , आरंभ सामाजिक संस्थेचे श्रमिक पोतदार , जेष्ठ नागरिक रघुवीर नागणे, संभाजी कांबळे, रजवी अबुलहसन, प्रा. आ. केंद्राचे वैद्यकीय   आधिकारी डाँ. राहुल जानराव आदीसह प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी , आशा कार्यकर्ती, लाभार्थी नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ,सुञसंचालन  व आभार परिचारिका सुमन  फुले यानी मानले. 

लसीकरण "सोमवार आणि शनिवार" असे दोन दिवस चालू राहणार असुन  60 वर्षावरील तसेच 45 वर्षा पुढिल लोकांना  मधुमेह, रक्तदाब इत्यादी आजार असणाऱ्यांना ही लस देण्यात येणार आहे. ही लस सुरक्षित आहे. त्यामुळे सर्वांनी या लसीकरणाचा लाभ  घेण्याचे आवाहन रुग्ण कल्याण समितीचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, वैद्यकीय आधिकारी डाॕ. राहुल जानराव  यानी  केले.
 
Top