तुळजापूर, दि. २३:
येथिल यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात दि. २० मार्च रोजी जागतिक चिमणी दिवस, २१ मार्च रोजी जागतिक वन्यदिन, व दि.२२ मार्च रोजी जागतिक जल दिन, या तिन्ही दिनाचे औचित्य साधून "पर्यावरण-२०२१" या भित्ती पत्रकाचे अनावरण बालाघाट शिक्षण संस्थेचे सचिव उल्हास बोरगावकर यांच्या हस्ते करण्यात आले.
या निमित्त महाविद्यालयात पर्यावरण , मत्स्यशास्त्र , नॅक विभागाच्या वतीने कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये चिमणी दिन ,वन्यदिन, जलदिन याचे लेख आणि चित्राचे भित्तीपत्रक नॅक समन्वय डॉ. प्रवीण भाले, मत्स्यशास्त्र विभागाचे डॉ. शिवाजी जेटीथोर, रसायनशास्त्र विभागाच्या प्रा.स्नेहा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कु. ऋतुजा घोरपडे, कु.स्नेहा जाधव, अनिकेत कदम, कु. दिव्या देशमुख, कु. प्रीती जाधव यांनी भित्तिपत्रकाचे निर्माण केले.
प्रारंभी उल्हास बोरगावकर यांचे स्वागत प्राचार्य डॉ. मोहन बाबरे यांनी केले.तसेच डॉ.मोहन बाबरे ,उपप्राचार्य डॉ. नरसिंग जाधव, सिनेट सदस्य प्रो. डॉ. गोविंद काळे यांचे स्वागत प्रो. डॉ.अनिल शित्रे, प्रा. डॉ.प्रवीण भाले यांनी केले. प्रास्ताविक प्रा. स्नेहा ठाकूर यांनी केले.
सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. शिवाजी जेटीथोर यांनी तर आभार प्रवीण भाले यांनी मानले. या कार्यक्रमास डाॕ. शेषेराव जावळे, डाॕ. सुरेंद्र मोरे, डॉ. शशिकला भालकरे, प्रा. अनिल पाटील, डॉ. अंबादास बिराजदार, डॉ. पांडुरंग शिवशरण तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजू बनसोडे, माऊली माने, बासूतकर, समीर शेख,ताकमोघे यांनी पुढाकार घेतले.