जळकोट,दि.२२:मेघराज किलजे
पावसाचे समुद्राला वाहून जाणारे पाणी अडवून गावातील पाण्याची समस्या सोडवण्यासाठी जलसाठे निर्माण करण्यासाठी आता गावकऱ्यांनीच पुढाकार घ्यावा. असे विचार जळकोट येथील श्रीगणेश कृषी विज्ञान मंडळ व कृषी वाचनालय या संस्थेचे अध्यक्ष मेघराज किलजे यांनी रामतीर्थ येथे व्यक्त केले.

दिलासा प्रतिष्ठान, औरंगाबाद एसबीआय फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामसेवा कार्यक्रमांतर्गत जागतिक जल दिन रामतीर्थ, रामनगर, येडोळा, गायरान तांडा व जखनी तांडा येथे साजरा करण्यात आला. 

यावेळी गावकऱ्यांना मार्गदर्शन करताना आगामी काळातील  जलसंकट या विषयावर मेघराज किलजे हे बोलत होते. शुद्ध पाण्याचा वापर कसा करावा. या विषयावर जळकोट येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य कर्मचारी एस. एम. कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले.


यावेळी सरपंच बालाजी राठोड, माजी सरपंच शंकर राठोड, माजी उपसरपंच रामू चव्हाण, दिलासाचे कार्यक्रम समन्वयक गुरुदेव राठोड, बाबू राठोड, लक्ष्मण चव्हाण, लक्ष्मण राठोड, विकास चव्हाण, अभिजीत राठोड, अजित राठोड, विठ्ठल राठोड, मारुती राठोड, रामचंद्र चव्हाण आदीसह ग्रामस्थ व युवक उपस्थित होते.
 
Top