वागदरी,दि.१३: एस.के.गायकवाड
 पंचशील बुद्धविहार विपश्यना केंद्र दस्तापूर (आष्टामोड) ता.लोहारा येथे पंचशील बुद्धविहार विपश्यना केंद्र कमिटी च्यावतीने दस्तापुर ग्रामपंचायतच्या नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच व सदस्यांचा सत्कार उद्योजक  दिलीप माने, लोहारा शिवसेना तालुका उपप्रमुख जगन्नाथ पाटील, सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर मदने यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.

           
  प्रारंभी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीला पुष्पार्पण करून व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून नूतन सरपंच सौ. छबुबाई गावडे, उपसरपंच सोमनाथ पाटील व ग्रा.प. सदस्य अल्ताफ पटेल, गजेंद्र डावरे, सर्जेराव पाटील,ग्रा.प.सदस्या मनिषा काळाप्पा,सत्वशीला डावरे,सरिता चव्हाण, शाहीन पटेल,आदींचा फेटा,शाल,पुष्पहार, व पुष्पगुच्छ देवून  सत्कार करण्यात आला.

   
या प्रसंगी उपसरपंच सोमनाथ पाटील यांनी पंचशील बुद्धविहारास पाच हजार रुपये देणगी दिली.
   या कार्यक्रमाचे प्रस्ताविक विहार कमिटीचे सचिव रविंद्र डावरे यांनी तर  सुत्रसंचलन सहशिक्षक धोंडीराम कांबळे , आभार बालाजी डावरे यांनी मानले.

   
यावेळी परमेश्वर डावरे, रमेश गायकवाड, बालाजी सूतार, दादा काळाप्पा, विवेक चव्हाण, सचिन सुरवसे, मिलिंद डावरे, चंद्रमणी डावरे, शुभम डावरे, संकेत कांबळे, प्रतिक डावरे, पंचशील बुध्दविहार कमिटीचे सर्व संचालकासह ग्रामस्थ उपस्थित होते.
 
Top