तुळजापूर,दि.१७:
महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशानुसार तुळजापूर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पक्षाच्या सदस्य नोंदणीस प्रारंभ करण्यात आले असुन या सदस्य नोंदणीस युवकातुन उत्सर्फुत प्रतिसाद मिळत आहे.
पहिल्याच दिवशी ऑनलाईन वगळता १०० युवकांनी मनसेचे सदस्यत्व स्वीकारले , यावेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष महेश जाधव, विधानसभा अध्यक्ष मयुर गाढवे, गणेश पाटील, तालुका उपाध्यक्ष रोहित दळवी, धनाजी साठे, खंडू कुंभार , प्रशांत डोलारे , ऋषी माने, राहुल गायकवाड ,अतिलेश पुराणीक, सागर काळे, अभिमान कोळी, गणेश स्वामी, विशाल माने, सैरव रवळे, सलिम तांबोळी ,संजु बिराजदार, अनिकेत मायराणे, अभिजीत रोटे, अकाश काळे, राजु साळुंखे ,दशरथ चव्हाण, आदि मनसे सैनिक उपस्थित होते.