तुळजापूर, दि. १७ :   समाज सेवेसाठी समाज संघटन हे ब्रिद वाक्य घेवुन सावता सेनेचा महाराष्ट्रात विस्तार होण्यासाठी उस्मानाबाद जिल्हाध्यक्षपदी रविंद्र वडगांवकर यांची निवड करण्यात आली आहे. 

    
 रविंद्र वडगांवकर हे गेल्या दहा वर्षापासुन सामाजिक व राष्ट्रीय कार्य करीत आहेत.त्यांच्या समाजकार्याबद्दल असलेली आवड व संघटन कार्यातील अनुभव याची दखल घेवुन सावता सेनेचे संस्थापक अध्यक्ष मुंजाजी गोरे यांनी वडगांवकर याना  निवडीचे पत्र दिले आहे. 

या निवडीबद्दल संत सावता महाराज अरण यांचे वंशज ह.भ.प.रमेश महाराज वसेकर व रविकांत महाराज वसेकर सावता सेना महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष संगीता माळी, प्रदेश महासचिव विलास भुजबळ, सोलापूर जिल्हाध्यक्ष  तुकाराम सातव, उपजिल्हाध्यक्ष देवकर विष्णू , विनायक साळुंके,भुजंग मुखेरकर, दिपक देशमुख, बापू वडगांकर, शंकर गिरी, रेवण बंडगर, शिवाजी तेलंग,आदींनी निवड झाल्याबद्दल अभिनंद केले.
 
Top