तुळजापुर, दि. १५ :
तुळजापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये  अतिवृष्टीनंतर करण्यात आलेल्या पंचनामाच्या संदर्भाने मुख्यमंत्री कार्यालयाकडे तातडीने पिक विमा कंपन्यास निर्देश देण्याची मागणी करून सरसकट सर्व शेतकऱ्यांना विमा दिला जावा अशी ठाम भूमिका घेतली होती.

 त्याची मुख्यमंत्री ठाकरे यांनी दखल घेउन यासंदर्भात  कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.

तुळजापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दर्शन पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कृषी मंत्री दादा भुसे यांना निवेदन देऊन तुळजापूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने पिकाचे आणि जमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे करण्यात आले. मात्र शेतकऱ्यांनी 72 तासाच्या वेळेमध्ये फोटो इंटरनेटवरून अपलोड न केल्याच्या कारणावरून शेतकऱ्यांचा विमा फेटाळण्यात आला. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सदर प्रकरणांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कृषी मंत्री दादा भुसे यांना पत्र देवुन  बजाज कंपनीच्या जाचक अटी दूर करून पीकविमा देण्याची मागणी केली  होती. याप्रकरणी  मुख्यमंत्री कार्यालयाने दखल घेऊन  कारवाई करण्याचे आदेश  दिले आहेत.

धैर्यशील पाटील,  तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी तुळजापूर

अतिवृष्टीमुळे तुळजापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पिकाचे आणि जमिनीचे नुकसान झाले आहे. हे नुकसान न भरून येणारे असल्यामुळे मुख्यमंत्री कार्यालयाने यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मागणीनंतर कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.

 
Top