तुळजापूर, दि. ७: डॉ सतीश महामुनी
तुळजापूर येथील समाजसेवक पंकज शहाणे यानी बोरी नदीच्या खोलीकरणासाठी गेल्या काही दिवसापासून केलेले प्रयत्न कौतुकास्पद असून बोरी नदीचा विस्तारासाठी हे काम  गरजेचे असुन त्यांना याकामी  नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने दिनेश बागल यांनी केले आहे.

 तुळजापूर भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने नदी खोलीकरणाच्या कामाकरिता   दोन हजार रुपयेची मदत केली. यावेळी मान्यवर पदाधिकारी भारतीय  जनता युवा मोर्चाचे नेते दिनेश  बागल ,  नानासाहेब डोंगरे , राम चोपदार, सागर कदम उपस्थित होते.
 या निमित्ताने प्रत्यक्ष कामावर भेट दिल्यानंतर भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी पंकज शहाणे यांना तालुक्यातील नागरिकांच्या वतीने धन्यवाद दिले आहेत. युवा मोर्चाच्या वतीने अशा प्रकारच्या सामाजिक कार्यासाठी आगामी काळात सहकार्य केले जाईल असे आश्वासन  बागल व  चोपदार यांनी दिले. 

तुळजापूर तालुक्यात  बोरी नदी, बोरी धरण या दोन्ही महत्वाच्या गोष्टी आहेत. बोरी नदीचे संवर्धन आणि पाण्याचा जपून वापर करण्याच्या अनुषंगाने समाजसेवक अंकुश राणे यांनी सुरू केलेली ही बोरी नदीच्या मूळ प्रवाहला पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न आहे. यामध्ये समाजातील  दानशूर व्यक्तींनी केलेली मदत खूप महत्त्वाची आहे.  या मदती मधून बोरी नदीचे वैभव वाढत आहे. याचा उपयोग परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीला होणार आहे. त्यामुळे सर्वांनी पंकज शहाणे यांना सहकार्य करण्याची भूमिका ठेवावी परिसरातील शेतकऱ्यांनी देखील त्यांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन करण्यात आले.
 
Top