नळदुर्ग ,दि.१५ एस.के.गायकवाड
लाँकडाऊन नंतर सुरु झालेली एस.टी.बस सेवा आता कुठे सुरळीत चालू होत असतानाच सोलापूर आगारतील वहाक व चालकाचा मनमानी कारभाराने प्रवाशी वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे.
एस.टी.बस सेवेवरील प्रवासी जनतेची असलेली विश्वासार्हता कमी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची चर्चा दि.९ मार्च २०२१ रोजी घडलेल्या प्रकारा वरून जाणवते. मंगळवार दि.०९ मार्च रोजी सोलापूर येथून सायंकाळी ४.३०.वाजता इटकळ , अणदूर मार्गे नळदुर्गला येणारी बस क्रमांक एम.एच.-१४ ०९२७ ही अणदूर बसस्थानकात आलीच नाही. ती बस अणदुर बसस्थानका समोर हायवेवर थांबवून अणदूर येथे उतरणाऱ्या प्रवशाना उतराविले व बस्थाकातील अणदूर ते नळदुर्ग जाणाऱ्या एका ही प्रवाशाला बस मध्ये न घेता नळदुर्गला गेले.एवढ्यावरच न थांबता त्यांनी नळदुर्ग येथून नियमित ठिक ०६.० वाजता सुटणारी ही बस त्यानी वीस मिनिटे आगोदरच म्हणजे ठिक ५.४० मि.वाजता नळदुर्गच्या वहातूक नियंत्रकाला न जुमानता नळदुर्ग बसस्थानकातून हालवली.त्यामुळे नियमित सहा वाजता या बसने जाणाऱ्या नोकरदार, व्यवसायिक, व प्रवाशांची एकच तारांबळ उडाली. मनमानी कारभाराबाबत नळदुर्ग येथील ईरफान काझीसह काही प्रवाशी यांनी सोलापूर आगार प्रमुख यांना लेखी तक्रार देवून कळविले असून सदर बससेवा सुरळीत करून प्रवाशांची गैरसोय टाळण्याची मागणी केली आहे.