चिवरी, दि.१४:
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दर रविवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या नवीन आदेशावरून जनता कर्फ्यूचे आदेश पारित करण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने चिवरी येथील नागरिकांनी घरातच राहून नियमाचे काटेकोरपणे पालन करून प्रशासनाच्या आवाहनास उत्सर्फुत प्रतिसाद मिळाला.
यासाठी ग्रामपंचायत सरपंच अशोक घोडके, उपसरपंच बालाजी पाटील, ग्रामसेवक गोरोबा गायकवाड पोलीस पाटील रुपेश बिराजदार, आदींनी पुढाकार घेतले.