तुळजापुर, दि. ३१ :
दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असुन धावपळीत तहानेने व्याकुळ झालेल्यांची, तृष्णा भागविण्याकरिता
प्रशांत अपराध यांच्या वतीने तुळजापूर शहरातील पोलीस ठाण्यात पाणपोईचा शुभारंभ करण्यात आला आहे.
मराठा क्रांती ठोक मोर्चा वतीने उन्हाळ्यासाठी थंड पाण्याची सोय व्हावी या उद्देशातून पाण्याचे जार वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन राज्य समन्वयक सज्जनराव साळुंके व पोलीस निरीक्षक राठोड यांच्या हस्ते झाले
.यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक जीवनराजे इंगळे, आबासाहेब कापसे, प्रशांत अपराध, अजय साळुंके, महेश गवळी, राम चोपदार, मंगेश घाडगे, बाळासाहेब चिखलकर, शरद जगदाळे, कुमार टोले, अण्णासाहेब क्षिरसागर आदी मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
मराठा क्रांती ठोक मोर्चाचे कार्यकर्ते प्रशांत अपराध यांच्या वतीने पोलीस कर्मचारी आणि येथे येणाऱ्या नागरिकांना उन्हाळ्याच्या दिवसात थंड पाण्याची सोय करण्यात आली आहे.