तुळजापूर, दि. ३१ ;
शहरातील उपजिल्हा रूग्णालयात कोविड 19 करिता जवळपास दोन महिन्यापासून लसीकरणची मोहिम राबविण्यात येत असून आजपर्यंत 3 हजारापेक्षा अधिक नागरिकांना लसीकरण करण्यात आले आहे. लाभार्थ्यांनी अफवांवर विश्वास न ठेवता , कोणतीही भीती न बाळगता लसीकरण करून घेण्याचे आवाहन प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने करण्यात आले.
तुळजापूर येथे दि. 1 फेब्रुवारी रोजी पासून लसीकरण करण्यात येत आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. लस आतिशय सुरक्षित असून नागरिकांनी स्वतःसह कुटुंबाच्या सुरक्षेसाठी लस घेऊन प्रशासनास सहकार्य करण्याचे अवाहन प्रहार पक्षाचे तुळजापूर तालुका अध्यक्ष जुबेर शेख यांनी केले आहे.
तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालय येथे लसीकरण असून तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केद्रांतही लसीकरण सुरू आहे. तरी नागरिकांनी आपल्या सोयीनुसार जाऊन लसीकरण करून घ्यावे. तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात आजपर्यंत 3 हजार 200 नागरिकांना लस देण्यात आली आहे. वैद्यकिय अधिक्षक डॉ. चंचला बोडके, डॉ. एस. ए.जाधव डॉ. रोचकरी यांच्या मार्गदर्शनाखाली लससीकरण देण्यात येत आहे. त्यामुळे 60 वर्षावरील जेष्ठ नागरीक मधुमेह , रक्तदाब यासारखे आजार असणार्यानी आणि 45 वर्षापुढील नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे.