मुरुम, दि. ३१ :
येथील विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याच्या सभागृहात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपचे शहराध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक राम डोंगरे, बंजारा समाजाचे अध्यक्ष बाला राठोड, आनंद नगरचे ग्रामपंचायत सदस्य भिमराव कांबळे, माजी सदस्य राम राठोड, तानाजी राठोड, बाबु राठोड आदींसह परिसरातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी पक्षातील एकाधिकारशाहीला कंटाळून बुधवार दि.३१ मार्च रोजी काँग्रेस पक्षात रितसर प्रवेश केला.
यावेळी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष बापुराव पाटील यांच्या हस्ते नुतन कार्यकर्त्यांना पक्षाचा दुप्पटा घालून काँग्रेस पक्षात प्रवेश देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष विजयकुमार सोनवणे, विकास हराळकर, मुरूमच्या विकासेसोचे चेअरमन दत्ता चटगे, युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस महालिंग बाबशेट्टी, तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल वाघ, शहराध्यक्ष सुधीर चव्हाण, माजी नगराध्यक्ष बबनराव बनसोडे, दिलीप शेळके, संजय चव्हाण, संतोष पवार, विनायक पवार, तरबेज मासुलदार, चांदपाशा मुल्ला, बालाजी राठोड, अयेश राठोड, वालचंद राठोड, खिरु पवार, युवक काँग्रेसचे श्रीहरी पाटील, राजु मुल्ला, किरण गायकवाड, देवराज संगुळगे, महेश शिंदे, विकास शिंदे आदींच्या उपस्थितीत प्रवेश कार्यक्रम पार पडला.