नळदुर्ग,दि.१: एस.के.गायकवाड

उस्मानाबाद जिल्ह्यातील मौजे चव्हाणवाडी ता.तुळजापूर येथील प्राजक्ता सुरेश चव्हाण व सोलापूर जिल्ह्यातील मौजे पिंजारवाडी ता.दक्षिण सोलापूर येथील शाहाना शब्बीर नदाफ या दोघीही महाराष्ट्रीयन मैत्रीणी असाम रायफल फोर्स मध्ये दाखल झाल्या आहेत.


सध्या प्रत्येक  क्षेत्रात महिला सक्षमपणे काम करताना दिसत आहेत. महाराष्ट्रातच नव्हे तर सर्वत्र रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. सुशिक्षित युवक, युवती नोकरीच्या शोधात आहेत. त्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. अशा प्रतिकूल परिस्थितीत महाराष्ट्राच्या  ग्रामीण भागातील  शहाना  नदाफ व प्राजक्ता चव्हाण या दोन धाडसी युवती असाम रायफल फोर्स मध्ये दाखल झालेल्या आहेत. 
दि.३१ मार्च २०२१ रोजी त्यांच्य पालकानी त्यांना अत्यंत जड अंतकरणाने नळदुर्ग बसस्थानकावरुन असामला  विमानाने जाण्यासाठी त्याना  हैदराबादला पाठवताना प्रत्येकाच्या डोळ्यात आनंदाश्रू दिसून आले. 

या दोन्ही धाडसी युवतींचे परिवर्तन सामाजिक संस्थेचे सचिव मारुती बनसोडे, रिपाइंचे जिल्हा सचिव तथा पत्रकार एस.के. गायकवाड यासह उपस्थित नागरिकानी नळदुर्ग बसस्थानकावर आभिनंदन करून शुभेच्छा  दिल्या.
 
Top