तुळजापूर, दि.३१
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी सर्वत्र लोककल्याणकारी कार्य केल्याचे सर्वश्रुत असुन सन 1764 साली तुळजापूर शहरात भाविक-भक्तांसाठी बारव बांधली होती,त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्यामुळे या बारवला कचराकुंडीचे स्वरूप प्राप्त झाले होते.ही बाब लक्षात आल्यानंतर मल्हार आर्मीच्या पदाधिकाऱ्यांनी तात्काळ बैठक घेऊन मंगळवार दि. 31 मार्च रोजी बारव स्वछता मोहीम आयोजित करून बारवची संपूर्ण स्वच्छता केली .
तुळजापूर शहरातील हा मोठा ऐतिहासिक वारसा असून, त्याची दुरावस्था झाल्याचे दिसून आले. याबाबत प्रशासनाने उपाययोजना करण्याची मागणी जनतेतून होत आहे. बुधवार रोजी राबविण्यात आलेल्या स्वछता मोहिमेत आण्णा बंडगर, समर्थ पैलवान, प्रमोद दाणे, वैभव लकडे, समाधान पडुळकर, सचिन हाक्के, प्रतीक देवकर, सुमित पालवे, मल्लिकार्जुन सुलतानपुरे, लिंगप्पा गंज्याळी आदींनी सहभागी झाले होते.