नळदुर्ग, दि.३१
शिव- बसव- राणा सार्वजनिक जन्मोत्सव समितीच्यावतीने बुधवारी सायंकाळी नळदुर्ग शहरातील भवानी चौकात छत्रपती शिवाजी महाराज, बसवेश्वर महाराज, व महाराणा प्रताप महाराज या तिन्ही महापुरुषांच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना करण्यात आली.यावेळी कोरोना कालावधीत उत्कृष्ट कार्य करणा-या महिला कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला.
कोरोना मुळे सामाजिक अंतर ठेवून व सर्व नियमांचे पालन करून साध्या पद्धतीने प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी कोरोना कालावधीत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी ज्योती तीर्थ, परिचारीका सुमन फुले, सविता गोरे, शेरखाने, तेजस्वीनी जाधव, गोबाळे रमा व पोलीस महिला कॉन्स्टेबल गिरी आदींचे शिव बसव राणा सार्वजनिक जन्मोत्सव समितीच्या वतीने गौरव करण्यात आला.
यावेळी दृष्टी उद्योगचे अशोक जगदाळे , शिवसेनेचे माजी जिल्हा उपप्रमुख कमलाकर चव्हाण, तालुका उपप्रमुख सरदारसिंग ठाकूर, शहरप्रमुख संतोष पुदाले, भाजपा शहराध्यक्ष पद्माकर घोडक, नगरसेवक नितीन कासार, अमृत पुदाले, सुधीर हजारे, शरद बागल, समितीचे अध्यक्ष सुनील गव्हाणे, नेताजी जाधव, भाजयुमोचे शहराध्यक्ष श्रमिक पोतदार, भीमाशंकर बताले, शाम कनकधर, यसमसजिक कार्यकर्ते मारूती बनसोडे, संजय जाधव, पत्रकार विलास येडगे, उत्तम बणजगोळे, शिवाजी नाईक, अमित शेंडगे, राजेंद्र काशिद, आदींजण उपस्थित होते.