उस्मानाबाद,दि.२४:
तालुक्यातील सकनेवाडी येथील विद्यार्थिनीना सायकलींचे बुधवार दि.२४ मार्च रोजी मोफत वाटप करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून महिला व बाल कल्याण विभागाच्या वतीने या सायकलींचे वाटप करण्यात आले.
सकनेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात धनंजय रणदिवे, रत्नमाला टेकाळे, बी. एच. निपाणीकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
यावेळी उस्मानाबादचे बालविकास प्रकल्प अधिकारी अनिल कांबळे, सरपंच सारिका काकडे, उपसरपंच अतुल चव्हाण, मुख्याध्यापक मुंडे, सहशिक्षिका सुतार, रामा चव्हाण, किशोर घायतिडक, शुभम सिरसट, किशोर चव्हाण, गुणवंत दांगट, सुरज चव्हाण, अजित सिरसट, गणेश सिरसट, तुषार सिरसट, विकास दांगट, लिंबराज कुंभार, राम शितोळे, शिवराम सिरसट, संतोष वाडेकर, गणेश घायतिडक, आकाश सिरसट, दिपक पांचाळ, अक्षय शितोळे, बालाजी चव्हाण, हणुमंत काकडे आदींसह विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.
सकनेवाडी येथे शिक्षणाची सोय नसल्याने विद्यार्थी मोठ्या संख्येने सारोळा येथील शारदा विद्या निकेतन हायस्कुलमध्ये येतात. मात्र विद्यार्थिनीना पायपीट करत शिक्षण घ्यावे लागत आहे. हीच बाब ओळखून सारोळा ग्रामपंचायत सदस्य विनोद बाकले यांनी महिला व बालकल्याण विभागाकडे पाठपुरावा करून चार सायकली मंजूर करून घेतल्या आहेत. तसेच स्व:खर्चातून दोन सायकली दिल्या आहेत.