तुळजापूर, दि.२४: 
कोरोनाच्या दुसऱ्या  लाटेचा फटका नगरपालिकेचा मालमत्ता कर वसूलीला बसला असून प्रशासनाने निर्बंध लादताच पालिकेचा दैनंदिन वसूलीत ५० टक्के घट झाल्याची माहिती पुढे येत आहे. 

   मार्च अखेर  शभंर टक्के वसूलीचे उद्दिष्ट धुसर झाले आहे. दरम्यान २२ मार्च अखेर केवळ ५९ टक्के  वसूली झाली आहे. 

   कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने निर्बंध लादल्याने अर्थकारण कोलमडले आहे. कोरोनाचा दुसऱ्या  लाटेचा नागरिकांनी चांगलाच  धसका घेतला असून पुन्हा एकदा लाॅकडाऊनच्या  भीतीने  नागरिक चिंतीत झाले आहे. प्रशासनाने लादलेल्या  निर्बधा मुळे मुळातच अर्थकारण कोलमडले असून नागरिकांनी हात आखडता घेतला आहे. याचा परिणाम पालिकेच्या वसूलीवर होत आहे. पालिकेने फेब्रुवारी मध्येच शहरात विविध भागात मोक्याच्या  ठिकाणी वसूली कॅम्प लावून मालमत्ता कराची वसूली सुरू केली होती. सुरूवातीला वसूलीस  चांगला प्रतिसाद मिळत होता. मात्र नंतर लाॅकडाऊनच्या चर्चेने नागरिकांनी हात आखडता घेतल्याने वसूलीत घट झाल्याचे समजते.

  सुरवातीला दैनंदिन सरासरी  ०४ लाख रूपये असणारी वसूली घटून ०२ लाख रुपयांवर आली आहे. 

यामुळे मार्च अखेर शभंर टक्के  वसूलीचे पालिकेचे उद्दिष्ट धोक्यात आल्याची चर्चा रंगली आहे.
 
Top