जळकोट, दि.२४:
दिलासा प्रतिष्ठान, औरंगाबाद व एसबीआय फाउंडेशन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामसेवा कार्यक्रमांतर्गत तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील प्राथमिक आरोग्य केंद्र,  नळदुर्ग येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात  कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर निर्जंतुकिकरण करण्याकरिता व  स्च्छतेसाठी फिनेलचे वाटप करण्यात आले.

जळकोट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सरपंच अशोकराव पाटील यांच्या हस्ते फिनेल वाटप करण्यात आले. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सातपुते, राष्ट्रवादी जिल्हा सहचिटणीस महेश कदम, उपसरपंचपती बसवराज कवठे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुनील माने, श्रीगणेश कृषी विज्ञान मंडळ व कृषी  वाचनालय या संस्थेचे अध्यक्ष मेघराज किलजे, दिलासाचे विलास राठोड, गुरुदेव राठोड, श्रीशैल दरेकर, हासुरे, औषध निर्माता होनाळे, कर्मचारी उपस्थित होते. 

नळदुर्ग येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात झालेल्या कार्यक्रमास वैद्यकीय अधिकारी डॉ. राहूल जानराव, डॉ. ज्योती तीर्थ, सीएचओ डॉ. नलावडे, आरोग्य सहायक एम. बी .जाधव, आरोग्य सहाय्यक  टी. जी.   साळुंखे, औषध निर्माता गणेश बडूरे, नळदुर्ग एसबीआय शाखेचे व्यवस्थापक निर्माण पारकर, निळकंठ राठोड, विलास राठोड, भूषण पवार, किरण राठोड, प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते.
 
Top