तुळजापूर,दि.२४ : 
दोन वर्षापुर्वी श्री.तुळजाभवानी    देवीच्या भक्ताची तुळजापूरात  हरवलेली पर्स पुजारी यानी शोध घेवुन परत केल्याबद्दल सर्वञ  त्यांचे कौतुक करुन आभिनंदन केले जात आहे.

 पुणे येथील काळेपडळ हाडपसर येथील भाविक संगिता  वाघमारे यांची पर्स तुळजापूर येथील प्रसाद दूकानदार  मनोज कल्याणराव देशमुख यांनी दोन वर्षा पासून जपून ठेवली होती . देशमुख यांनी बराच प्रयत्न करूनही त्या भाविकाशी संपर्क  होत नव्हता. 

दरम्यान दि.२३ मार्च  मंगळवार रोजी देशमुख हे देवीचे पुजारी दिलीप खपले यांच्या सोबत चर्चा करताना वरील माहिती दिली. यावेळी देशमुख यांनी पर्सचा विषय काढला असता पुजारी दिलीप खपले यांचे भाविक हे हडपसर येथेच राहतात. लागलीच खपले यांनी त्या भाविकाला फोन केला व पर्स मधील आधार कार्डवरील भाविका बाबत चौकशी केली.  ते भाविक सदरील भाविकांना ओळखत होते. त्यांनी त्या भाविकांना विचारणा केल्यावर त्यांनी सांगीतले की, आमचीच पर्स दोन वर्षा पुर्वी तुळजापूरात गहाळ झाली होती. 

 योगायोगाने ते भाविक देवीच्या दर्शनासाठी तुळजापूरातच आलेले होते.  लगेचच त्या भाविकांशी संपर्क केला .  बुधवार दि.२४ मार्च  रोजी देशमुख यांच्या  दुकाना समोरच  खात्री करूनच त्या भाविकांना ती पर्स जशास तसी परत केली. त्या पर्समध्ये रोख रक्कम  दहा हजार रुपये, आधार कार्ड ,पँन कार्ड , व काही फोटो होते. ती पर्स मिळाल्यावर त्या भाविकांनी देशमुख यांचे आभार मानले . 
 
Top