वागदरी, दि.२३: एस.के.गायकवाड
 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रागंणात संविधानाची प्रतिकृती बसवून  वेगळ्या पद्धतीने साजरी करण्याची मागणी  रिपाइं (आठवले)च्या वतीने जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांना निवेदन देण्यात आले.


  रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया (आठवले) उस्मानाबाद जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी याना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, येत्या दि.१४ एप्रिल रोजी भारतिय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३० व्या जयंती निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रागंणात भारतिय संविधानाची प्रतिकृती  बसवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून  आभिवादन करावे, एक  वेगळ्या पध्दतीने जयंती साजरी करण्यात यावी असे रिपाइंच्या लेखी निवेदनात म्हटले आहे.

   
जिल्हाधिकारी याना देण्यात आलेल्या निवेदनवर रिपाइंचे जिल्हा संघटक सचिव सोमनाथ गायकवाड, उस्मानाबाद तालुका अध्यक्ष भालचंद्र कटारे, तुळजापूर तालुका कार्याध्यक्ष बाबासाहेब म्हस्के, माजी प.स.सदस्य विष्णू घोडके, रवी कांबळे यासह कार्यकर्त्यांच्या सह्याआहेत.
 
Top