तुळजापुर, दि. २३ :
कोरोना रुग्ण संख्या लक्षात घेऊन तुळजापूर नगरपरिषदेच्या वतीने विना मास्क फिरणा-या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याची मोहीम सुरु करण्यात आली असुन ७७ लोकांवर कारवाई करण्यात आली आहे.
दि.२३ मार्च रोजी नगर परिषदेच्या वतीने शहरातील एस.टी.स्टँंन्ड परिसर ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक , भवानी रोड या भागात कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे शहरातील विविध भागात विनामास्क फिरणा-या नागरिकावर व वाहन चालक आदींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
एकूण ७७ लोकांवर दंडाची कार्यवाही करुन रु.७ हजार ८०० दंड वसुल करण्यात आला.
दंड वसुली पथकात दत्ता साळुंके, मुज्जफर शेख, सज्जन गायकवाड ,प्रमोद माळी ,संजय झाडपिडे, गुणवंत कदम, विश्वाास मोटे, सुशांत गायकवाड व अतिक्रमण विभागातील कर्मचारी यांनी लोकांना मास्क लावण्याचे आवाहन केले. व विनामास्क् फिरणा-या ७७ लोकावर दंडाची कार्यवाही केली.