तुळजापुर, दि. १९ :

तुळजापूर येथील पूर्णाकृती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अनेक वर्षांपूर्वी मंजुरी मिळाली आहे. मात्र अद्याप पुतळा उभारले नाही. येणा-या  आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने नवीन पूर्णाकृती पुतळ्याचे संकल्पचित्र जनतेसमोर सादर करावे अशी मागणी समस्त तुळजापूर येथील भिम बांधवांच्या वतीने निवेदनाद्वारे नगरपरिषदेच्या प्रशासनाकडे केली आहे.


 सदर निवेदनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्याच्या अनुषंगाने महत्त्वाच्या सूचना करून बाबासाहेबांचा हा पूर्णाकृती पुतळा काम आणि सुशोभीकरण  लवकरात लवकर सुरू करावे अशी मागणी    सागर कदम,  लक्ष्मण कदम, कुणाल रोंगे, किरण कदम, संजय कदम, सुरज दांडे,  गोकुळ कदम, विशाल कांबळे, आकाश जाधव, पृथ्वीराज परदेशी यांनी केली आहे.

तुळजापूर येथे  प्रथम दर्शनी भागामध्ये असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर  पुतळा परिसरामध्ये   पूर्णाकृती पुतळा व्हावा, यासाठी नगरपरिषदेच्या वतीने प्रशासकीय मान्यता घेतलेली म्हटले आहे.  पुतळा उभारणीसाठी लवकरात लवकर सुरुवात करण्यात यावी अशीही मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
 
Top