तुळजापूर,दि.१९ : 
    कै. नारायणराजे गवळी यांच्या स्मरणार्थ नळदुर्ग रोड वरील संपर्क कार्यालयात जारच्या पाणपोईचा शुभारंभ करण्यात आला. 

उन्हाळा संपे पर्यंत नागरिकांना थंडगार जारचे पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 

  नळदुर्ग रोड वरील संपर्क कार्यालयात आयोजित कार्यक्रमात बाजार समितीचे सभापती विजय गंगणे,  उद्योजक शशी ज्योत यांच्या प्रमुखा उपस्थितीत पाणपोईचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी प्रकाश मगर, प्रदिप अमृतराव, शहाजी जाधव, भारत सुर्यवंशी, शुभम साठे, संपत गंगणे, दादा दळवी आदींची उपस्थिती होती.     
 
Top