तुळजापुर, दि. १९ :
तुळजापूर तालुक्यातील खुदावाडी येथे गेल्या दोन महिन्यापासून विद्युतपुरवठा सुरळीत नसल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण होत आहे, याप्रश्नी शेतकऱ्यांनी एकत्रितपणे तुळजापूर येथील महावितरणचे कार्यकारी अभियंत्यास निवेदन देऊन तक्रार दाखल केली.
गेल्या दोन महिन्यापासून खुदावाडी येथील शेतकऱ्यांच्या विद्युत पुरवठ्याच्या गैरसोयीची तक्रार १९ मार्च रोजी तुळजापूर कार्यकारी अभियंता लोधे यांच्याकडे करण्यात आली .
निवेदनाची प्रत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना दिले.
याप्रसंगी गावातील नागरिक नरवडे श्रीधर, संतोष सागवे , गजानन सांगवे, विकास सांगवे, सिद्राम जवळगे , सिद्धारूढ कबाडे ,नागेश नरवडे ,राहुल नरवडे, निरंजन पाटील ,मोहन कबाडे, इत्यादी उपस्थित होते.
गावातील होणाऱ्या अखंडित विद्युत पुरवठ्याची तक्रार देण्यात आली आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून तातडीने लक्ष घालून लवकरात लवकर वीज पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले.