तुळजापूर, दि. १९: 
कोरोना संकट काळामधील शेतकऱ्यांची वीज बिले तातडीने कमी करावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तुळजापुरात निवेदन देण्यात आले. तहसीलदार सौदागर तांदळे यांना दिलेल्या निवेदनामध्ये राज्यभर शेतकऱ्यांना ही सवलत देण्याची मागणी करण्यात आली आहे.


स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात सर्वत्र तहसीलदार यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांची वीज बिले कमी करण्याची मागणी करण्यात येत आहे. या मागणीचे तुळजापुरात निवेदन देण्यात आले.

 या प्रसंगी धनाजी पेंदे, तालुका अध्यक्ष नेताजी जगदाळे, शहराध्यक्ष प्रदीप जगदाळे, उमेश जमदाडे, मुकेश भोसले, संतोष भोजने, विकास भोजने , ज्ञानेश्वर जमदाडे, रत्नेश गाटे, संजय भोसले, दुर्वास भोजने यांची उपस्थिती होती.
 
Top