नळदुर्ग,दि.२१
तुळजापूर तालुक्यातील चिकुंद्रा येथील विकास बब्रुवान जगदाळे यांचे वयाच्या ४८ व्या वर्षी  दि.१९ मार्च  रोजी सायंकाळी ५:२० वाजण्याच्या सुमारास ह्रदय विकारांच्या  धक्क्याने निधन झाले. 

  महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या तुळजापूर आगारात गेली ९ वर्षे जगदाळे  हे वहाक म्हणून  कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले एक मुलगी, आई, वडील, एक लहान भाऊ , बहीण असा परिवार आहे ताचा अत्यंत विधी  दि. २० रोजी ४ वा. सुमारास  चिकुंद्रा येथील वैकुंठ धाम येथे अंत्यसंस्कार आले. तुळजापूर आगारात वहाक व चालक संघटनेच्या वतीने स्वर्गीय विकास बब्रुवान जगदाळे यांच्या मृत आत्म्यास श्रद्धांजली वाहण्यात आली.
 
Top