काटी ,दि.२१:उमाजी गायकवाड
तुळजापुर तालुक्यातील गोंधळवाडी येथे राहत्या घराला अचानक आग लागुन आगीत सोने, रोख रक्कम, संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले असून सुमारे ६ लाख रुपयाचे नुकसान झाल्याची घटना शनिवारी दुपारी 12 वाजता घडली .
गोंधळवाडी गावालगत महादेव शिवराम मोटे याची शेतजमीन असुन कुंटूबासह शेताच पत्र्याच्या घरात राहत होते. कुटूबातील सर्वजण ज्वारी काढणीसाठी शिवारात गेले होते. शुक्रवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास राहत्या पत्र्याच्या घरास अचानक आग लागली.
आगीच्या दुर्घटनेत घरातील 4 तोळे सोने, रोख रक्कम 50 हजार , 4 पोते गहू, ज्वारी 5 पोते, हरभरा 2 पोते, शेळीचे 2 पिले, कपडे, भांडी, 1 मोटार सायकल, 1जनरेटर' 1 गॅस सिलेडंर टाकी असे संसार उपयोगी साहीत्य जळुन सहा लाख रूपयाचे नुकसान झाले आहे.
आगीचे कारण समजु शकले नाही. अचानक लागलेल्या आगीत मोटे कुंटूबियाचा संसार उघड्यावर पडला आहे. दरम्यान आग लागल्यानंतर नंदकुमार मोटे, भिमराव रूपनर ,संभाजी माने ,सौरभ शिरगीरे, रमेश मोटे, धुळोबा सोलनकर , धर्मराज मोटे ,दत्ता माने आदी युवकानी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पण आग आटोक्यात आली नाही. या घटनेची माहीती सरपंच राजाभाऊ मोटे यानी महसुल , पोलीस प्रशासनास दिली तामलवाडी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.
रिकाम्या गॅस टाकीमुळे मोठी दुर्घटना टळली
आग लागलेल्या घरात गॅसची रिकामी टाकी होती ति गॅस भरलेली असती तर स्फोट होवुन मोठी दुर्घटना घडली असती आगीच्या ज्वालामुळे घराजवळील वडाचे झाड जळाले आहे तर शेळीचे दोन पिल जागीच मरून पडली आहेत घराचे पत्रे ही जळाले त्यामुळे राहायला घर खायला कणभर दाणा ही शिल्लक राहीला नाही तरी जळीतग्रस्त मोटे कुंटूबाला आर्थिक मदत मिळावी अशी मागणी सरपंच राजाभाऊ मोटे यानी केली आहे.