तामलवाडी, दि.२१ : 
तुळजापूर तालुक्यातील पांगरदरवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नव्याने रुजू झालेल्या शिक्षिका श्रीमती अनिता माने यांचे विद्यार्थी   पालक रंजनाताई गायकवाड यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. 


यापूर्वी श्रीमती माने या लातूर जिल्ह्यात ज्ञानदानाचे कार्य बजावत होत्या. लातूर येथून अंतरजिल्हा बदलीद्वारे त्यांची उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या समुपदेशनाद्वारे पांगरदरवाडी शाळेतील रिक्त जागेवर माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शनिवार दि.  20 मार्च रोजी त्यांचे शाळा व ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक उत्तरेश्वर पैकेकरी, सहशिक्षक राजेश धोंगडे, शांताराम कुंभार, अनिल हंगरकर, हर्षवर्धन माळी, कोळी  आदी उपस्थित होते.
 
Top