काटी , दि.२१
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील रहिवासी व काटीतील पहिले एम.बी.बी.एस. डॉक्टर तथा अकलूज येथील प्रसिद्ध डॉ.अतिक अहमद काझी यांच्या पत्नी मराठवाडा वक्फ बोर्डाच्या संचालिका श्रीमती रिजवाना अतिक अहमद काझी वय ( 65 ) यांचे शनिवारी पहाटे 3:30 वाजता औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचारा दरम्यान हृदय विकाराच्या धक्क्याने निधन झाले.
त्यांच्या पार्थिवावर शनिवारी सकाळी 11:30 वाजता औरंगाबाद येथील स्मशानभूमीत दफनविधी करण्यात आला.
त्यांच्या पश्चात पती डॉ.अतिक अहमद काझी, एक मुलगा,एक मुलगी,सुन, नातवंडे असा परिवार आहे.