तुळजापूर, दि. १८ :
बालाघाट शिक्षण संस्थेचे सचिव उल्हास बोरगावकर , आनंदीबाई रावराणे महाविद्यालय, वैभववाडीचे डॉ. ज्ञानेश्वर सिरसट, प्राचार्य डॉ. मोहन बाबरे, सदस्य संभाजी भोसले, उपप्राचार्य डॉ. नरसिंग जाधव ,सिनेट सदस्य सिनेट सदस्य प्रोफेसर गोविंद काळे यांची उपस्थिती होती.
राज्यस्तरीय कार्यशाळेचे उद्घाटन बालाघाट शिक्षण संस्थेचे सचिव उल्हासदादा बोरगावकर यांनी दीपप्रज्वलन करून केले.
याप्रसंगी मान्यवरांचे स्वागत प्राचार्य मोहन बाबरे, उपप्राचार्य नरसिंग जाधव ,नॅक समन्वयक प्रा. डॉ. प्रवीण भाले, प्रा. डॉ. मंदार गायकवाड यांनी केले. परिचय डॉ. प्रवीण भाले यांनी करून दिला.
यानंतर कार्यशाळेचे मुख्य मार्गदर्शक प्रा.डॉ.ज्ञानेश्वर सिरसट यांनी मार्गदर्शन केले . नॅक मधील सात भागा बाबतीत संपूर्ण माहिती त्यांनी सांगितली. त्याच बरोबर एस.एस. आर.संदर्भात महत्त्वाच्या सूचना करून मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे सूत्र संचालन सांस्कृतिक प्रमुख डॉ. शिवाजी जेटीथोर यांनी केले तर आभार उपप्राचार्य डॉ. नरसिंग जाधव यांनी मानले.
या कार्यशाळे साठी वरिष्ठ महाविद्यालयातील प्रा. डॉ ए.टी. कदम, प्रा. डॉ. अनिल शित्रे, डॉ सुरेंद्र मोरे,डॉ.ज्योतिबा राजकोंडा, डॉ. शेषराव जावळे, डॉ. ब्रहस्पति वाघमारे, डॉ. अशोक मरडे, डॉ.पांडुरंग शिवशरण, डॉ. कार्तिक पोळ, प्रा. प्रमोद मुळे, प्रा.कदम एन. एस. डॉ. शशिकला भालकरे, प्रा. सुमित्रा कोरेकर, प्रा. डॉ. आशा बिडकर, डॉ.विनय चौधरी, प्रा. ए. डी. पाटील,प्रा. डी. जी. डॉ. राजेश बोपलकर, जाधव, प्रा. डॉ.सतीश कदम ,डॉ. अंबादास बिराजदार,डॉ. श्रीरंग लोखंडे, डॉ. विलास राठोड, डॉ. अभिजीत बाबरे, प्रा.स्नेहा ठाकूर व इतर कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यशाळेसाठी नॅक समन्वयक .डॉ.प्रवीण भाले, सांस्कृतिक प्रमुख डॉ. शिवाजी जेटीथोर, डॉ. मंदार गायकवाड, प्रा. अमोद जोशी, महादेव जाधव,राजाभाऊ बनसोडे यांनी परिश्रम घेतले.