नळदुर्ग, दि.१३:  
लग्नाचे अमिष दाखवुन सतत दोन वर्ष महिलेच्या इच्छेविरूद्घ शारीरीक संबंध ठेवलेल्या अणदुर ता.तुळजापूर येथील नराधमा विरुद्घ नळदुर्ग पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल  करण्यात आला असुन  आरोपीस अटक करण्यात  आले आहे. 

  तुळजापूर तालुक्यातील अणदुर येथील मोलमजुरी करुन उपजिविका करणार्‍या एका महिलेला सुरवातीस लग्नाचे अमिष दाखवुन नंतर सतत दोन वर्ष त्या महिलेला दमदाटी करून व तीला मारहाण करून तिच्या इच्छेविरुद्घ अणदुर येथील  एका नराधमाने  शारीरीक संबंध ठेवल्याची तक्रार संबंधित महिलेने नळदुर्ग पोलीस ठाण्यात दिली आहे.  त्या पिडीत महिलेच्या तक्रारी वरुन  नळदुर्ग पोलीसात आरोपीविरुध्द भा. द. वि 376(2), 323,504,506 प्रमाणे  गुन्हा नोंद करण्यात आला असुन आरोपीस  तात्काळ अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कैलास लहाने हे करीत  आहेत.
 
Top