वागदरी, दि.११: एस.के.गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील वागदरी येथे महाशिवरात्री निमित्ताने येथील महादेव मंदीर सभागृहात ह.भ.प.राजकुमार पाटील यांच्या अधिपत्याखाली शिवलिला अमृत या पवित्र ग्रंथाचे वाचन करून विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.
वागदरी ता.तुळजापूर येथे पुरातन मल्लिकार्जुन महादेव मंदिर असून महाशिवरात्री एकादशी निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
दि.११ मार्च रोजी पहाटे पाच वाजल्यापासूनच कोरोनाच्या सावटाखाली भाविक भक्तांनी शासकीय नियमांचे पालन करत महादेवास बेलपान वाहावून दर्शन घेतले. मंदिर परिसरात असलेल्या सभागृहात ह.भ.प.राजकुमार पाटील यांच्या अधिष्ठानाखाली शिवलिला अमृत या पवित्र ग्रंथाचे वाचन करण्यात आले.
या प्रसंगी गावातील अबाल, वृध्द ,महिला व युवक,युवती भाविक भक्तानी सहभाग घेतला होता.
शेवटी उपवासाच्या फराळाचे वाटप करून कार्यक्रमची सांगता करण्यात आली.