तुळजापुर, दि. ११:
सर्व भाविकांनी आणि शहरवासीयांनी शासनाच्या निर्देशाप्रमाणे सामाजिक आतंर ठेवुन तुळजाभवानी देवीचे दर्शन घ्यावे, मंदिराच्या बाहेर परिसरात देखील नियमितपणे मास्क वापरावा असे आवाहन महंत तुकोजी महाराज यांनी केले.
महाशिवरात्र निमित्त तुळजाभवानी देवीचा भाविकांना शाबूदाना खिचडी व दूध मसाला वाटप करण्याचा कार्यक्रम घेण्यात आला आहे.
याप्रसंगी नगरसेवक औदुंबर कदम यांची उपस्थिती होती.
महंत तुकोजीबुवा यांच्या हस्ते भाविकांना मसाला दूध वाटप करण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक औदुंबर कदम, प्रकाश कदम, अभिषेक कदम, दयानंद कदम, अरुण कदम, शरद कदम, हिरा भांडेकर, बापू भालेकर, अण्णा कदम, क्रांती कदम, आकाश कदम, वैभव कदम, विरेंद्र कदम, लखन कदम, अमोल कांबळे, निलेश कदम या कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थिती होती.
भाविकांना प्रसादाच्या स्वरूपामध्ये महाशिवरात्रीच्या निमित्ताने फराळाचे वितरण करण्याचा संकल्प आमच्या मुलाने केलेला होता. त्यानुसार या सणाच्या निमित्ताने कार्यक्रम केल्याची माहिती यावेळी नगरसेवक औदुंबर कदम यांनी दिली.